Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Sunday, March 27, 2022

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस

गच्चीत टपटप करणार 

खिडकीतून दिसणारा

मन चींब  भीजवणारा

चहा की कॉफी

भजी की गरम खारे शेंगदाणे

मी काही बोलण्यासाठी 

तोंड उघडणार

इतक्यात तिचा चेहरा बोलतो

चल ना हातात हात घालून

बाहेर फिरायला जाऊ,

बाहेर पावसाकडे बघताना

मग आठवणींचा पाऊस येतो,

मित्रांसोबत दुचाकीवरून

भिजत केलेले ठिकाण 

हातात हात घालून

अंगावर घेतलेला पाऊस

नंतर सर्दी आल्यावर

तिने करून दिलेला

आले घातलेला 

बाहेर पावसाचे पाणी 

पुन्हा तो पाऊस.

                     कसा असतो ना पाऊस, पहिल्यांदा जेंव्हा येतो तेंव्हा आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येतो. संततधार लागतो तेंव्हा जरा कंटाळवाणा होतो. पण एक मात्र नक्की, पावसाचं अन आपल्या मनाचं काहीतरी कनेक्शन असतं, पाऊस आला की जशी गाणी आठवतात तशीच काही माणसं देखील आठवतात. पाऊस जुन्या आठवणी घेऊन येतो, नव्या देऊन जातो. पाऊस मनाची उलथापालथ करतो.

हलकासा पाऊस किंचित बोचरी थंडी

हातात वाफाळती कॉफी आणि त्याची उबदार मिठी

सुख ते हेच..पण 

तु नसताना तु असण्याचे भास मला झाले,

मन माझे पावसाळी ओलेचिंब झाले,

पाहताच तुला क्षमली माझ्या डोळ्यांची ती भुक.....

अन् माझ्याभोवती तु असण्याचे वलय नष्ट झाले.....

अन् पुन्हा एकदा त्या चांद राञी मनात भावनांचा गुंता झाला ...

अशाच एका मस्त पावसाळी दिवशी आपण खिडकीतून पावसाची मजा बघावी म्हणून सरसावून बसलेलो असतो.सोबत एखादं पुस्तक ,गरम चहा किंवा कॉफी असते, आणि भज्यांची फर्माईश केलेली असते त्यांचा सगळी स्वादकेंद्र उल्हासित करणारा भज्ज गंध सगळीकडे पसरला असतो.हळू हळू वारा वाहू लागतो, पावसाचा सुगंध ही येऊ लागतो.आपण डोळे मिटून हा स्वर्गीय अनुभव हृदयात साठवतो न साठवतो तोच अचानक वाऱ्याचा वेग एकदम वाढतो आणि आपण सावरायच्या आत तो वारा आणि पाठोपाठ दमदार पाऊस धसमुसळेपणाने आत घुसतो आणि आपली सगळी मनोरथे पाण्यात बुडवतो.या पावसाचा आनंद मानून स्वागत करायचं,की सारं आवरायचं की आपण खिडकी उघडी ठेवली या वेंधळेपणावर रागवायचं तेच आपल्याला सुचत नाही.पण यातही एक वेगळा आनंद असतो हेही खरच !!

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...