Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Tuesday, October 26, 2021

अनोळखी नात

कोणीतरी असावं अनोळखी, असून ओळखीच वाटणारं

गच्च डोळे भरलेल्या असावांना हळूच पुसणारं

कोणीतरी असं असाव, आपलस म्हणता येणार 

हक्काने मनातले चार शब्द व्यक्त करता येणारं

कोणी तरी असाव.,अवघड वाटणारं गणित सोप करू दाखवणार 

असं एक नात जे कधीच न तुटणारं

Friday, October 22, 2021

आयुष्यातील बदल

 आपण एकत्र घालवलेले ते क्षण अजुन ही आठवतात

तो क्षण खुप सुखद होता, जेव्हा तुझी माझी भेट झाली होती. 

तू दिलेला लाल गुलाब अजूनही जपून ठेवलाय मी, मनाच्या कुपित अत्तारासारखां

आणि तुलाही जपून ठेवल. पण तुझ्या अचानकपणे जाण्याने 

आयुष्यचं बदलून गेलं माझं

आता फरक फक्त एवढाच आहे

तेंव्हा गालावर हसू उमटत होत

आणि त्याच गालावर आता अश्रू ओघळतात..

खुप काही सांगायचं होत खुप काही बोलायचं होत.... 


Thursday, October 21, 2021

माझं स्वप्न


तुझ्या जवळ येण्यासाठी 

एकांत हवा आहे 

तुला मिठीत भरुन घेण्यासाठी 

तुझ्या सवे दोन शब्द बोलुन 

तुझ्या मनातल्या भावना जाणण्यासाठी 

तू हवा आहे

माहित नाही मला 

माझं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही. 

कारण, काही स्वप्न ही लाजाळूच्या झाडासारखी असतात. 

स्पर्श करताच मिटून जाणारी 

Wednesday, October 20, 2021

शब्दांच्या सरी

 नभ दाटून आले माझ्या अंगणात 

भिजून चिंब झाली एक ओसरी 

त्यात सांभाळलेल्या शब्दांच्या सरी

खेळ सुरू होता बाहेर पाण्याचा

साचले डबके काही क्षणांचे

रिमझिम बरसणार्‍या पावसात

येणारी त्याची हळवी आठवण,

स्पर्शून जातो अलगद वारा

अशीही एक रात्र यावी

सोबत तुझ्या जी विरून जावी

चांदण्यांच्या विश्वात  रमताना

साथ तुझी मला निरंतर मिळावी........

तू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी

पाउल खुणा मागे सारून

रात्र हि ती विरून जावी.......

चिंब भिजत ओलं होत मन....... 

कळता कळेना तुझ्या नजरेचा लपंडाव,

न कधी सांगितलेस तू तुझे गाव अन् नाव....

छेडूनी नजरेच्या त्या चोरट्या कटाक्षानी,

का आणतेस तू असा भोळेपणाचा आव.....

कुठे गेले ते दिवस ..

जेव्हा मी तुला भेटत होतो ..

तु जरी उशिराने आलीस ..

तरी तुला मात्र समजूण घेत होतो ..

एकदा मला भेटलीस की ..

बोलण तुझ संपत नव्हत ..

रडतानाही हसण तुझ्या ..

गालावर विरघळत होत ..

लाजण तुझ कमी नव्हत ..

पण गालावरच्या खळीमागे ..

ते ही हळूच दडून बसत होत ..

राग तर तुझ्या ..

नाकावरच्या शेङयावर होता ..

कितीही उपाय केले तरीही

तो काही कमी होत नव्हता ..

रागात तर तु फार ..

सुंदर दिसत होतीस ..

म्हणुन तर मला तु ..

तुझ्या रागासकट हवी होतीस..


Sunday, October 17, 2021

तुझी ओढ

तु इतकी दूर आहेस माझ्यापासून

 तरीही का इतकी जवळीक वाटावी.......

 माझ्या अंतरंगातून साकारलेली तुझी प्रतिमा 

 तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी.......

 तु आहेस सुंदर इतकी,

 कि मोगऱ्यालाही तुझी ओढ वाटावी.........

 त्या काळ्याभोर ढगांलाही

 ह्या चंद्राची ही कमी वाटावी..........

तुझा सहवास

 

प्रश्न सारे अडवत होते.

क्षणभराच्या सहवासाने 

दूरवर दिसत होते जे काही 

गुंतागुंती होते ह्रदयांची 

पुन्हा भेटू या आशेवर 

जीवन जगत राहते

असा कुठला क्षण नाही,

तुझी आठवण येत नाही,

अशी कुठली आठवण नाही,

 ज्यात तु येत नाही.

एकाच उत्तरला जवळ घेत होते. 


Wednesday, October 13, 2021

असतात काही नाती अशी

असतात काही नाती अशी

शब्दात कधी न

सांगता येणारी...

असतात काही नाती अशी

कळून सुधा कधी न कळणारी...


असतात काही नाती अशी

फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून

जाणारी...


असतात काही नाती अशी

न विसरता आठवणीत

राहणारी...


असतात काही नाती अशी

अमृता सारखा गोडवा जपणारी.


Monday, October 11, 2021

एक अनोळखी

 एक अनोळखी व्यक्ती 

अचानक आयुष्यत आली 

आणि बघता बघता ती माझं आयुष्यच झाली. 

कळत नकळत तिच्यात जीव गुंतला माझा 

तिचं कायम सोबत असणं हा ध्यास आहे.

तिच्या जवळ असल्याने बेधुंद होते मी 

तिच्या निरागस नजरेने मोहरून जाते मी

तिच्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेली 

ते सोडत होते डोळ्यांतून बाण मी मात्र घायाळ झाले

 त्याच्या जादुई हसण्यातच मी फसत गेली 

त्या मोहवणाऱ्या क्षणात मी हरवत गेली 

त्या पुसटश्या स्पर्शानही मी बेभान होत गेली 

तो गंध माझ्या तन -मनात नकळत साठवत गेला

कळलं नाही हा श्वास कधी झाला त्याचा 

इतक प्रेम तुझ्यावर मी कशी करत गेली 

शिंपल्यातला मोती

 तू नसताना सुद्धा, जगतच होते की 

आयुष्यचं बदलून गेलं होत माझ..

तुझ्या सहवासाने 

प्रेम तर खूप होतं तुझ्यावर आणि अजूनही आहे....

तू दिलेल्या गोड गुलाबी आठवणी अजूनही जपून ठेवल्यात मी 

मनाच्या कुपित, अत्तरासारख्यां ....

आणि तुलाही जपून ठेवणार आहे मनात 

शिंपल्यातल्या मोत्या सारखं

Sunday, October 10, 2021

रुसवा

 रुसवा सोड सखे नको हा अबोला 

दूर तुझ्या सहवास नको आत्ता 

चुकलो असेल नक्की मी 

इतका का अबोला 

नको आत्ता दुरावा सोड हा अबोला 

कायमचीच अंतरशील काळजी वाटतेय मनाला 

आता तरी बोल दोन शब्द उगाच त्रागा मनाला 

वारा विरहाचा

 आठवणींत तुझ्या, कवितेचे शब्द सुचले..

पण ओठांत आले जेव्हा, तेव्हा आसवांनी ते लगेच पुसले.. 

गगनात नभ दाटले पेलवेना वारा विरहाचा 

बेचैन करतो धो धो पाऊस 

खुप काही सांगायचं होत 

खुप काही बोलायचं होतं 

क्षणभर का होईना तुझा सहवास देऊन जा... 

हलक्या पावलांनी पुन्हा निघून जा... 

पण जाताना मात्र तुझ्यात पुन्हा मला गुंतवुन जा.... 

Saturday, October 9, 2021

आठवणीत तुझ्या

आठवणींत तुझ्या, कवितेचे शब्द सुचले..

अनोळखी आपन दोघेही... 

पण कसे गुंतलो एकमेकांत?... 

तुझ्या सहवासात, 

मनातल्या भावना हळुवार फुलतात. 

वसंतातल्या गुलमोहर सारख्या 

ही ओढ एकमेकांना कशी लागली. 

 तो क्षण खुप सुखद होता. 

जेव्हा तुझी माझी भेट झाली होती. 

तुझं सोबत असणं म्हणजे

 तप्त उन्हातल्या सावली सारख आहे. माझ्यासाठी...

रात्र मीलनाची

 ओढ लागली अशी मीलनाची

चांदणीही वाट पाहे चंद्राची 

पाऊस ही बरसे धुंद होऊनी

धरणी ही अशी आतुरलेली 

मंतरली रात अशी मीलनाची 

गोड मधुर आठवणींची 

 त्या मृदू रात्री

मोहरलेल्या वृक्षान भोवती

घ्यावेस तू मला मिठीत तुझ्या

विरून जावी माझी सखोल सावली

त्याच कोमल मिठीत तुझ्या

मी पूर्णतः स्वतःस विसरावे

गुलाबी स्पर्शाने तुझ्या मग

अनाहूतपणे तू मला जागे करावे

Friday, October 8, 2021

स्पर्शाने धुंद होते

 तुझ्या स्पर्शाने होते धुंद मी... 

रोज भेटतो तुझा स्पर्श , नव्या ने...

तू जवळ आल्यावर... 

फुलासारखं, फुलून जाते मी.. 

अलगद पापण्या मिटून... 

स्पर्श तुझा अनुभवते मी... 

प्रेमस्पर्श होता तुझा... 

दरवळते मी... 

जशी धुंद रातराणी 

तुझ्या मोहवणाऱ्या स्पर्शाने 

मुग्ध झाले मी.... 


Thursday, October 7, 2021

वलय

 हलकासा पाऊस किंचित बोचरी थंडी

हातात वाफाळती कॉफी आणि त्याची उबदार मिठी

सुख ते हेच..पण 

तु नसताना तु असण्याचे भास मला झाले,

मन माझे पावसाळी ओलेचिंब झाले,

पाहताच तुला क्षमली माझ्या डोळ्यांची ती भुक.....

अन् माझ्याभोवती तु असण्याचे वलय नष्ट झाले.....

अन् पुन्हा एकदा त्या चांद राञी मनात भावनांचा गुंता झाला ...

अशाच एका मस्त पावसाळी दिवशी आपण खिडकीतून पावसाची मजा बघावी म्हणून सरसावून बसलेलो असतो.सोबत एखादं पुस्तक ,गरम चहा किंवा कॉफी असते, आणि भज्यांची फर्माईश केलेली असते त्यांचा सगळी स्वादकेंद्र उल्हासित करणारा भज्ज गंध सगळीकडे पसरला असतो.हळू हळू वारा वाहू लागतो, पावसाचा सुगंध ही येऊ लागतो.आपण डोळे मिटून हा स्वर्गीय अनुभव हृदयात साठवतो न साठवतो तोच अचानक वाऱ्याचा वेग एकदम वाढतो आणि आपण सावरायच्या आत तो वारा आणि पाठोपाठ दमदार पाऊस धसमुसळेपणाने आत घुसतो आणि आपली सगळी मनोरथे पाण्यात बुडवतो.या पावसाचा आनंद मानून स्वागत करायचं,की सारं आवरायचं की आपण खिडकी उघडी ठेवली या वेंधळेपणावर रागवायचं तेच आपल्याला सुचत नाही.पण यातही एक वेगळा आनंद असतो हेही खरच !!

एकटीच मी

 मनाला धुंद करणारा चाफा तू 

तुला प्रेमाने बिलगणारी प्रेमिका मी 

पुनवेचा चंद्र तू 

तुला पाहण्यासाठी रात्री उमलणारी रातराणी मी 

जेव्हा  एकटीच असते मी.... 

तेव्हा तुझ्या आठवणी मनात फेर धरून नाचू लागतात माझ्या.... 

तूच सांग? विरहाची वेदना लिहू, कि आपन एकत्र होतो. 

त्या गोड आठवणी लिहू 

तुझी आणि माझी पहिली भेट, 

अजूनही आठवणीत आहे माझ्या... 

पण खरं सांगू तुला 

तुझी वाट पाहण्याची सवय अजूनही जात नाही माझी.

Wednesday, October 6, 2021

कलाकृती

माझ्या प्रत्येक शिल्पाची तू कलाकृती आहे 

मी अथांग सागर, तर माझ्यात सामावणारी तु सरीता आहे ........ 

 मी चांदणे पांघरलेले आकाश तर तू रातराणीचं फुल आहे ....... 

मी कोसळणारा पाऊस तर तू ओल्या मातीचा सुगंध आहे

एकांत हवा

मला तू हवा आहे 

तुझ्या जवळ येण्यासाठी 

एकांत हवा आहे 

तुला मिठीत भरुन घेण्यासाठी 

तुझ्या सवे दोन शब्द बोलुन 

तुझ्या मनातल्या भावना जाणण्यासाठी 

तू हवा आहे

तुझ्या सोबत आलेल्या 

सार्या सुखद क्षणांना मनाच्या कुपीत 

अलगद जपुन ठेवण्यासाठी 

अन् तु जवळ नसतानाही 

ती बंद कुपी उघडुन तुझ्या 

आठवणींचा आनंद लुटण्यासाठी 

एकांत हवा आहे..... 


Tuesday, October 5, 2021

अबोल शब्द

अबोल झाले आज माझे शब्दही

जेंव्हा तु साथ देण्याचं वचन देऊन

अर्ध्यावरती डाव मोडून गेलास....

अबोल झाल्या आज माझ्या भावनाही

 नकळत तुझे आयुष्यातून निघून जाणे

जशी फुललेली बाग क्षणात ओसाड होणे. ...

अश्रुनी दाटलेल्या डोळ्यांनी तुला शेवटचे पाहणे

 तुझ्या आठवणीने पापणीचे

ओलचिंब होवून जाणे शांत अशा 

सागरात लाटेचे ते उसळून येणे.

तुझ्या आठवणीरुपी सागराला शांत कसे करता येईल

अंतरीचे सुख

 दूरवर दिसत होते जे काही  

सरताना धुके विरहाचे  

सख्या तुझी याद यावी  

तुझ्या एका मीठीची आशा  

 मिठीत तुझ्या आज  मला हरवावस वाटत.. 

आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत.. 

अंतरीचे सुख माझ्याकडे का नाही?  ...

तुझीच मी

 अंतर खुप वाढलंय,

आज तुझ्यात अन माझ्यात...!!

तु आता दुर राहतोस

पण तुझी आठवण मात्र जवळ आहे..

तुला कधीच जाणवणार नाही,

कारण तुला माझ्यासाठी वेळच नाही...!!

जरी कितीही दूर असलास तू तरी मी तुझ्या जवळच असेल.... 

जेव्हा चांदण्यात फिरशील एकटा तेव्हा दरवळणारा रातराणीचा गंध मीच असेल ... 

माझ्या पासून तू कितीही दूर असलास, तरी तुझ्या वर जिवापाड प्रेम करणारी मीच असेल

आपली रात्र

 मला अजूनही आठवतेय ती आपली रात्र.... 

प्रोर्णिमेंच्या प्रकाशात हात धरून दूरवर चांदण्यात निथळंलेल्या   आकाशात मी उभी होते, 

अजिंठातल्या शिल्पासारखी, निश्चल जशी वार्याला लाजुन, पानाआड लपनारी लाजाळू काळीच.... 

आपल्या प्रणयाची  चाहूल बहुतेक कल्पवृक्षाला सुद्धा लागली असावी 

ती प्रणयाची रात्र धुंद गंधाने भरलेल्या मोगर्‍याच्या सुंगधासारखी होती.... 

त्या आठवणी दरवळत आहेत 

मनात माझ्या

Monday, October 4, 2021

ती मदमस्त रात्र

 पुन्हा त्या रात्री दोघ एकत्र आलो 

पुन्हा मी तुझ्या मिठीत विसावले 

खुप दिवसांनी तुझा स्पर्श झाला 

पुन्हा मी फुलून गेले सूर्यकांती सारखी 

पुन्हा तू माझ्यात सामावून बेधुंद झाला

तू त्या रात्री दिलेला तो त्रास मी विसरू कशी....

अजूनही तडफडते आहे....

मी सांगू कशी 

त्या गोड आठवणी मनातच आहेत...

कुणापुढे मी बोलू तरी कशी...

तू दिसला नाहीस तर मी बेचैन होते...

तूच सांग मी राहू कशी ...

क्षणभर सहवास

 क्षणभराच्या सहवासाने गुंतागुंत होते ह्रदयांची 

पुन्हा भेटू या आशेवर जीवन जगत राहतो

आनंदाचा शिडकाव्याने जीवन उजळून जाते 

 गप्पा गोष्टी करता-करता असा कुठला क्षण नाही,

तुझी आठवण येत नाही,अशी कुठली आठवण नाही,

ज्यात तु येत नाही.

तुझ्या नाजूक स्पर्शानी वार्याच्या प्रत्येक झुळ्कीतून

मला रोमांचित करणारी तू....

तुझ्या मादक गांधानी हसणार्या प्रत्येक फुलातून

मला फुलवणारी तू....

तुझ्या अवखळ लीलांनी हलणार्या प्रत्येक पानातून

मला भुरळ पडणारी तू....

तुझ्या बरसणार्या प्रेमधारेत कोसळणार्या प्रत्येक सरीतून

मला चिंब भिजवणारी तू....


Sunday, October 3, 2021

आभास


वयात आल्यापासून आरसा जरा जास्तच जवळचा वाटू लागला,

येता जाता घरातून बाहेर मला नेहमीच भेटू लागला.

दिवसातून दहा दहा वेळा आरशात स्वतःला बघायचे. 

विस्कटलेले नसले जरी केस तरी,

पुन्हा पुन्हा त्यांना आवडीने सावरायचे.

आरशात पाहून मग स्वतःचीच खास मैत्रीण व्हायचे. 

आपल्यासारखीच दुसरी कोणी तरी भेटली या कल्पनेनेच मन वेडे व्हायचे. 



                                                  

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...