तिची इच्छा
कधी वाटते तुला कवेत घ्यावे
नजरेत तुझ्या नजर मिळवुनी
बाहुपाशात थांबावे, ओठांवर ओठ ठेउनी
पण मन म्हणते थांब जरा
तिची इच्छा आहे का ते पाहू दे
आठवणींचे स्वर
तुझ्या आठवणींचे
स्वर हे इतके मधुर होते
पण ओठांत आले जेव्हा,
तेव्हा आसवांनी ते पुसले
अजूनही जपून ठेवले
मी मनाच्या कुपित, अत्तरासारखे
शिंपल्यातल्या मौल्यवन मोत्यासारखे
दिसत नसले तरी
तुझ्या माझ्या प्रेमात होते
अमृतापरी गोड होते.
सवारेऽऽऽऽ सख्या
कितीदा समजावून सांगावे
तू ज्या अपेक्षा करतो
त्या मी नाही पूर्ण करू शकत
तुच सांग आता मनातील भावनांना
कितीदा मी सावरावे
जुने भाव नव्याने वापरावे
फुलांचा गंध
मनाला धुंद करणारा चाफा तू
तुला प्रेमाने बिलगणारी प्रेमिका मी
मला अजूनही आठवतेय ती आपली रात्र
प्रोर्णिमेंच्या प्रकाशात हात धरून दूरवर चांदण्यात
तुझ्या नाजूक स्पर्शानी वार्याच्या प्रत्येक झुळ्कीतून
मला रोमांचित करणारा तू....
तुझ्या मादक गांधानी हसणार्या प्रत्येक फुलातून
मला फुलवणारा तू....
तुझ्या अवखळ लीलांनी हलणार्या प्रत्येक पानातून
मला भुरळ पडणारा तू....
तुझ्या बरसणार्या प्रेमधारेत कोसळणार्या प्रत्येक सरीतून
मला चिंब भिजवणारा तू...
निथळंलेल्या आकाशात मी उभी होते
तुझ्या सहवासात, मनातल्या भावना हळुवार फुलत
ती प्रणयाची रात्र धुंद गंधाने भरलेल्या चाफ्याच्या सुंगधासारखी होती
अलगद पापण्या मिटून स्पर्श तुझा अनुभवते
जुनं ते स्मितहास्य फुलवत राहते
आनंदाच्या सागरात
आनंदाच्या या सागरात डुंबावे
असा कुठला क्षण नाही,
तुझी आठवण येत नाही,
अशी कुठली आठवण नाही,
ज्यात तु येत नाही.
रात आली पुनवेची
चंद्र होता जवळ
इच्छा माझी प्रबळ
गार गार हवेत
बहर आला यौवनाचा
अविरत भावना
अन खट्याळ मन
दाटलेला कंठ माझा
उचंबळत्या लाटा
फुलल्या रानवाटा
खुप दिवसांनी मी
पुन्हा उमलून गेले
क्षितिजावरती भावना
हळुवारपणे फुलताना
आठवणीने जीवनी माझ्या
जणु चाफा फुलला.....
तिची सवय
कलह कितीही झाला तरी
एकदा तरी तिची आठवण येते,
जरी कितीही दूर असली ती
तरी मी तिच्या जवळच असेल..
तिच्या आठवणीत मी रमतो,
बोलण नाही होत रोज रोज,
तिच्या आठवणी मला सतत छळतात
मनातून निघाल्यावर डोळ्यांकडे वळतात
तिची आणि माझी पहिली भेट,
अजूनही आठवणीत आहे माझ्या
पण तिची वाट पाहण्याची सवय अजूनही जात नाही माझी
अर्थ नवा
चंद्र हा झाकोळलेला
त्या अनोळखी वाटेवर
वाटलंच नव्हतं तु भेटशील
पुन्हा त्या रात्री
तुझ्या मिठीत विसावले
खुप दिवसांनी
मी उमलुन गेली
तुझ्या मोहवणाऱ्या स्पर्शाने
मुग्ध झाले मी
उधळून सुंदर आनंदाचे रंग