Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Tuesday, December 28, 2021

अभूतपूर्व अशी शिल्पकला


          शून्यापासून सुरु झालेला प्रवास शेवटी शून्य होऊन जातो.आयुष्याचं कोडं. कधीच सुटत नाही पण त्यातून माणसं मात्र उलगडत जातात. शेवटी अगणित यात्रा असते हे किती क्षणाचं आयुष्य असतं नाही. बघता बघता काळ सरकत जातो आणि शेवटची मांडणी करून उत्तराची वाट न बघता मावळतिचा पूर्णविराम देतो तो काळ .....

भारतीय शिल्पकला  ही अत्यंत प्राचीन असून वात्सायनाने शिल्पकलेच्या षडांगांची माहिती दिलेली आहे. कुठलीही कलाकृती सौंदर्याभिरुचिपूर्ण तेव्हाच बनते, जेव्हा वर्णिलेली षडांगे त्या कलाकृतीत असतातच. रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य योजनम्, सादृश्यं आणि वर्णिका भंग ही सहा अंगे एकाच कलाकृतीत जेव्हा अंतभूर्त होतात, तेव्हा ती कलाकृती समृद्ध होते. स्मृतिप्रवण ठरते आणि रसिकमनाचा ठाव घेते.

मला वेगवेगळी गावं फिरण्याचा छंद आहे. त्या त्या गावाची भाषा समजून घेण्याचे व्यसन आहे. गाव बोलते मायेने. मंदिरातून बोलते, मूर्तीतून बोलते,  एखाद्या सुरकुतलेल्या थरथरणा-या हातातून बोलते, देवाला अर्पण केलेल्या भाकर तुकड्यातून बोलते, गाभाऱ्यात पसरलेल्या भंडा-यातून बोलते, गुरं राखणा-या घुंगुरकाठीतून बोलते.... ती भाषा समजायला हवी बस्स... 

त्या संवादाचे फोटो तर आपण क्लिक करत असतोच....मात्र घरी आल्यावर शांतपणे खूप वेगळ्याच फ्रेम सापडतात.... खूप निराळ्या मात्र एकदम जिवंत असणाऱ्या फ्रेम्स.... 

आपण मंदिरे, मूर्ती, स्थापत्य याचे फोटो काढत असतोच असतो मात्र काही जिवंत क्षण आणि संवेदना अलगदपणे आपल्या हातात येतात...

वेरुळ हे मूर्तिमंत काव्य आहे. इथले दगड बोलतात आपल्याशी. छिन्नीचा हर एक घाव म्हणजे एकेक अक्षर आहे. ही शिल्पं म्हणजे केवळ मूर्ती नाहीत, तर कहाण्या आहेत. अनसंग सॉंग्ज आहेत.

इथलं काव्य, इथलं संगीत, इथलं नृत्य पकडण्याचा प्रयत्न कितीजणांनी केला असेल? मुळात ते समजून तरी घेण्याची तळमळ आपल्याकडे आहे? 


नृत्य हे भारतीय संस्कृतीचं अविभाज्य अंग आहेच पण त्यातली परिपूर्णता म्हंजे काय हे आकळायला नर्तक - नर्तकीनी इथली शिवाची तांडवनृत्य शिल्पं समजून घेऊन पहायला हवीत. त्यात लपलेल्या इमोशन्सचा वेध घेता यायला हवा.  तसं झालं तर लवचिकता, ग्रेस/सहजसुंदरता यांचे आयाम बदलून जातील, त्यांची नृत्यकला समृद्ध होईल. 

ध्यास वेरुळ 

श्वास वेरुळ 

अशी अवस्था व्हावी इतकं वेरुळ अफाट आहे. 

मी वेरुळमधून बाहेर पडलो  तर वेरुळच कायमचं मनांत वस्तीला आलंय. 

वेरुळ हे मूर्तिमंत काव्य आहे. इथले दगड बोलतात आपल्याशी. छिन्नीचा हर एक घाव म्हणजे एकेक अक्षर आहे. ही शिल्पं म्हणजे केवळ मूर्ती नाहीत, तर कहाण्या आहेत. 

इथे शरीरशास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, वास्तुशास्त्र अशी अनेक शास्त्रं आहेत, गणित आहे, तत्वज्ञान आहे, मानवी भावनांचं अतिशय तरल असं प्रकटीकरण आहे. 

इथल्या प्रत्येक आकृतीला लय आहे, नाद आहे. अनाम कारागिरांनी साकार केलेलं हे शिल्पायन बघतांना भान विसरायला होतं, डोळे भरत रहातात, हा संपन्न वारसा जतन करण्यासाठी काहीतरी करावं म्हणून जीव तडफडतो. 


Tuesday, December 21, 2021

अभिनंदन सोहळा

 घेता स्वामी नाम 

धन्य जीवन झाले 

ब्रह्मांडनायकाच्या दर्शनाने 

सुख हे दारी आले. 

                            मानसी


बेभानक्षणी  भान विसरून 

पाय कधीतरी घसरतो 

भानावर येता क्षणी माणुस 

लगेच स्वत:ला सावरतो. 

                           काव्यसखी रंजू 

Congratulations. !!

जेष्ठ कवयित्री मानसी जी आणी रंजू जी 

हे दोन नावे सर्वांना परिचित आहेतच. 

आज त्या दोघी प्रथम क्रमांकावर विराजमान झाल्या आहे. आध्यात्मिक मानसी जी आणि स्त्रीविशेष रंजू जी एक भक्तीकाव्य पुर्ती तर दूसरी चारोळीची राणी  

अश्या दोन कवयित्री यांचा मला सहवास लाभला मी माझे भाग्य समजतो. 

कारण एकीने मला रस्ता दिला तर दूसरीने रस्त्यावर चालायला शिकवले. माझ्या कविता साहित्य प्रवासात त्याचा खुप मोलाचा वाटा आहे. आज माझ जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादाने शुभेच्छानीं आहे. 

तसेच काव्यपुष्प समूहाचे आधारस्तंभ आहेत. काव्यपुष्प समूहात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांचे वेळोवेळी नवोदितांना संधी अणि मार्गदर्शन लाभते. मी त्याच्या साठी एक छान कविता अशोक पत्की यांनी संगीत दिलेली कविता समर्पित करतो त्यांनी ती यूट्यूब ला जाऊन ऐकावी. 🙏

जडतो तो जीव

लागते ती आस

बुडतो तो सूर्य

उरे तो आभास

कळे तोच अर्थ

उडे तोच रंग

ढळतो तो अश्रू

सुटतो तो संग

दाटते ती माया

सरे तोच काळ

ज्याला नाही ठाव

ते तर आभाळ

घननीळा डोह

पोटी गुढ माया

आभाळमाया … आभाळमाया (संग्रहित) 

 

 तुमच्या साहित्य लेखणीला मानाचा मुजरा ...!

त्यात वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या काव्यची 

शब्द संपदा अनोखी शैली लेखन कौशल्य आम्हांस पहावयास मिळवे.आपण तर नेहमीच उत्साहाचे स्फुंर्तिस्थान आहातच.म्हणूनच आम्ही आपणांस 

खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा अभिनंदन.!!!

आणि पुढील  वाटचालीसाठी पुर्णतेसाठी मनोकामना.

मनातले भाव


            मी आणि एकांत 


 आजकाल इथं आम्ही फक्त

 दोघेच असतो..

मी आणि माझा एकांत 

आजकाल तसं दुस-या कुणाशी

फारसं बोलू वाटत नाही..

तासन तास दोघं बोलत बसतो,

निश्चल अश्या अंधाराच्या कोठडीशी,

कधी मनात जपलेल्या आठवणींशी..

                 

                                     मनाशी संवाद 

दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...?... पूर्वी तू माझ्याशी खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायची 


हकीकत 

कभी

सोचा है 

जो आसमाँ का जमीं से है

हकीकत का ख़्वाब से है

दिन का रात से है...

ये कभी इक दूसरे से मिल नही पाते

लेकिन इक दूसरे के बिना

रह भी नहीं पाते...

हाँ सिर्फ़ तुमसे है

दिल का...दिल से ....


Tuesday, December 7, 2021

आनंदी गाव

 वारकरी संप्रदायत संतांनी जात, धर्म, लिंग, वंश या पलिकडे जाऊन माणूस म्हणून सर्वांना एक झाले पाहिजे, अशी शिकवण दिली. त्यातूनच सर्व जाती- धर्मांच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी परंपरा समृध्द केली. वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, वेगवेगळी संस्कृती असलेले, वेगवेगळ्या सामाजिक स्थरातून आलेले, वेगवेगळी आर्थिक परिस्थिती असलेले संत एकत्र आले. या संतानी पाहिलेल्या  समताधिष्टित समाजाचे देखणे रूप आपल्याला पंढरपूरला जाणा-या विविध संतांच्या आषाढीच्या पालखी सोहळ्यात पहायला मिळते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संतांच्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंड्यामध्ये सुमारे चार - पाच लाख लोक सहभागी झालेले असतात. या सहभागी झालेल्यांमध्ये कुणी कुणाला जात विचारीत नाही, कुणी कुणाला धर्म विचारित नाही, कुणी कुणाला कोणत्या भागातून आला आहेस हे विचारित नाही, कुणी कुणाला गरीब आहेस की श्रीमंत आहेस म्हणून विचारित, कुणी कुणाला त्याचे पद विचारित नाही. कुणी कुणाला स्री किंवा पुरुष आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. मंत्रालयात मंत्रीपदावर बसलेले मंत्री आणि त्यांच्याच कार्यालयात असणारा सफाई कामगार किंवा शिपाई एकाच दिंडीत चालतात. एकाच पंगतीला बसतात. 22 ते 30 दिवसांच्या प्रवासात. (काही संतांच्या दिंड्या 22 दिवसांत पोहचतात तर काही दूरवरून येणा-या संतांच्या दिंड्याना 30 दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो.) कोणत्याही यंत्रणेत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत नाही. अलिकडे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री महानगरामध्ये नववर्ष साजरे केले जाते. मुंबई सारख्या मोठ्या शहरात लोक समुद्र किनारी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करतात. त्यावेळी अनेकजणांनी मद्यपान केलेले असते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पाच पन्नास हजार लोक दोन-तीन तास एकत्र येतात तर तेथे बंदोबस्तासाठी शेकडो पोलिसांना तैनात करावे लागते. गेट वे ऑफ इंडिया,  जुहू, शिवाजी पार्क, गिरगाव हे समुद्र किनारे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात त्या प्रत्येक पोलीस ठाण्यात तसेच भारतात काही भागात 31डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत किती तरी लाखो  गुन्हे दाखल होतात.  तक्रारी येतात. त्यात चोरी आणि विनयभंगाच्या तक्रारीचे प्रमाण मोठे असते. म्हणजे केवळ पाच पन्नास लोक दोन-तीन तास एकत्र आले तर शे-दिडशे गुन्हे वेगवेगळ्या भागात दाखल होतात. मात्र चार ते पाच लाख लोक सलग 22 दिवस एकत्र प्रवास करतात, एकत्र मुक्काम करतात. या काळात अनेक महिला उघड्यावर आंघोळ करतात. पण या काळात एकही गुन्हा दाखल होत नाही. एकही माता-भगिनी माझ्याकडे कुणी वाईट नजरेने पाहिले, चूकीचा स्पर्श केला अशी तक्रार करीत नाही. दिंड्याना जो क्रम लाऊन दिलेला आहे, तो क्रम कुणी बदलत नाही. हे कशाच्या बळावर हे सगळं इतकं सहज आणि  सुरळीत चालत. ते बळ आहे बंधुत्वाचं. प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि बंधुत्वाची भावनाच 22 दिवस एकमेकांच्या माणुसपणाला सन्मान देत वाटचाल करते. माणूसपणाला उन्नत करण्याची  भावना ही बंधुत्वातून निर्माण होते.  

तर बंधुत्वाची भावना मजबूत झाली तर पोलिसांच्या हस्तक्षेपाची गरज उरणार नाही,  याचे उदाहरण आपल्याला आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात पहायला मिळते.
पालखी सोहळ्यात संत वचनांचा सतत जागर होतो. त्यातूनच बंधुत्व प्रत्येकाच्या कृतीतून पाझरते. बंधुत्व-बंधुत्व म्हणजे तरी काय? तर प्रत्येकाच्या मनात परस्पर प्रेम, जिव्हाळा निर्माण होणे. संत परंपरेने प्रेमाचाच जागर केला आहे.केवढा मोठा हा संदेश आहे. मत्सरविरहीत समाजातच खरे बंधुत्व नांदू शकते. आषाढी वारीमध्ये कोणीही कुणाचा जात, धर्म, वंश, लिंग यावरून मत्सर करीत नाही. म्हणूनच बंधुत्वाचा अविष्कार तिथे पहायला मिळतो. सध्या वारीत दिसणारे बंधुत्व समाजात रुजेल तेव्हा समता आणि स्वातंत्र्य आपोआपच हातात हात घालून चालेल. बंधुत्वाचा विचार समाजात रुजावा यासाठी संत विचारांचा जागर झाला पाहिजे. ज्या दिवशी बंधुत्वाचा विचार समाजात रुजेल तेव्हाच आनंदी गाव सापडला असे म्हणता येईल.

Sunday, December 5, 2021

माणसाला माणूस करून गेला

 ही आस नाही केली, श्रीमंतीच्या धनाची


फुलविली बाग ऐसी, येथे परिश्रमाची,


दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा


गुणवंत पाहिला मी, अन्यायी झुंजणारा


विसरून गेला शेवटी, जातीयतेची ज्वाला


भीमराव माणसाला, माणूस करून गेला


काळाच्या डोळ्यावरती, बसलेली होती कात


तू दाविली पहाट, उज्ज्वल प्रखर ती ज्योत


विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम!

आज भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे त्या भारतीयांना त्यांच्या निधनानंतर ५०-५५ वर्षांनी त्यांचे आपल्या देशाच्या राजकीय घटनेमध्ये किती मौल्यवान योगदान आहे याचा साक्षात्कार व्हायला लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत आणि घटना तयार होताना तिच्या जडणघडणीत तसेच तिचा मसुदा तयार करण्यात त्यांनी सर्वाधिक कष्ट घेतलेले आहेत. शेवटी कोणताही समाज कसा चालावा हे कायद्यावरून ठरत असते आणि भारतीय घटनेने आधुनिक कायदे दिलेले आहेत. आता आपल्या देशाचे जे विकासगामी चित्र निर्माण झालेले आहे ते करण्याची तरतूद  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेत केली आहे. त्यामुळे हे शक्य झालेले आहे.


भारतात अनेक लहान-मोठ्या लढाया आणि सततचा रक्तपात यामुळे सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अस्थिरता माजलेल्या या देशाचे आताचे जे चित्र आहे ते त्या हजार वर्षांच्या इतिहासाच्या तुलनेत तपासून पाहिले तर असे लक्षात येते की, भारताची आता होत असलेली जडणघडण ही सावकाशीने झालेली पण एक क्रांती आहे. हजार वर्षाची अस्थिरता, राजेशाही, त्यानंतरची इंग्रजांची गुलामगिरी यानंतर स्वतंत्र झालेला हा देश नेमका कोणत्या राज्यपद्धतीने चालावा याचा निर्णय करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.


या देशातल्या राजकीय परंपरा, लोकांची मनःस्थिती, सामाजिक स्थिती, इतिहास या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून या देशाला कोणत्या प्रकारची राज्यपद्धती योग्य ठरेल याचा निर्णय या नेत्यांनी  केला आणि त्याचे सारे कायदेशीर तपशील डॉ. आंबेडकरांनी आपली विद्वत्ता पणाला लावून घटनेमध्ये शब्दबद्ध केले. भारताच्या राजकीय घटनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दोन देणग्या प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या आहेत. त्यातली पहिली देणगी आहे लोकशाहीतील विविध यंत्रणांचे अधिकार आणि त्यांचे परस्परांवरील नियंत्रण.


देशाचा कारभार तीन स्तंभांवर आधारलेला आहे. संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका. यातली संसद सर्वात श्रेष्ठ आहेच कारण ती जनतेने निवडून दिलेली आहे. मात्र न्यायपालिका आणि कार्यपालिका यांनासुध्दा  भारतीय घटनने तेवढेच महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. या तिघांच्या अधिकाराचा कोठेही टकराव होऊ नये यासाठी या तीन यंत्रणांचे संबंध कसे असावेत याबाबत आपल्या घटनेत जे नियम केलेले आहेत. ते नियम फार विचारपूर्वक केलेले असल्यामुळेच आपली लोकशाही टिकलेली आहे.  त्यातल्या प्रत्येकाला आपले स्वायत्त अधिकार राबविण्याची मुभा दिली. परंतु त्यातला कोणताही घटक आपल्या स्वायत्त अधिकारामध्ये एकाधिकार गाजवू शकणार नाही, अशीही नियंत्रणे त्याच्यावर ठेवली. त्यामुळे ही लोकशाही स्थिर झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबरला झाले असल्यामुळे आज त्यांचा महापरीनिर्वाण दिन देशभर पाळला जात आहे. भारतीयांना अजोड अशी घटना दिल्याबद्दल आपण सर्वांनीच आज त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. या महामानवास लक्ष लक्ष प्रणाम.

कविता संग्रह

 मला अजूनही आठवतेय ती आपली रात्र.... 

प्रोर्णिमेच्या प्रकाशात हात धरून दूरवर चांदण्यात निथळलेलं आकाशात मी उभी होते, 

अजिंठातल्या शिल्पासारखी, निश्चल जशी वर्याला लाजुन, पानाआड लपनारी लाजाळू काळीच.... 

आपल्या प्रणयाची  चाहूल बहुतेक कल्पवृक्षाला सुद्धा लागली असावी 

ती प्रणयाची रात्र धुंद गंधाने भरलेल्या मोगर्‍याच्या सुंगधासारखी होती.... 

त्या आठवणी दरवळत आहेत 

मनात माझ्या

तू शिल्पकार, तर मी शिल्पकृती आहे. 

तू अथांग सागर, तर तुझ्यात सामावनारी मी सरीता 

तू चांदणे पांघरलेले आकाश तर मी रातराणीचं फुल 

तू कोसळणारा पाऊस तर मी ओल्या मातीचा सुगंध आहे

कसा मी पडलो प्रेमात ,

कधी कळलं नाही....


क्षणांत भेट झाली ,

मनाने मने जुळली ,

तिच्या मनात माझ्या बद्दल ची प्रेमभावना जागी झाली ...


सांजवेळी त्याच्यासाठी मी सजली ,

चाफ्याच्या  सुंगधाप्रमाणे दरवळी..

माझ्यासाठी जणु रातराणीच फुलली ..



प्रेम हे जगावेगळेच जन्मले ,

माझ्या हृदयात तिचे नाव ,

तिच्या हृदयात माझे नाव ..

जन्मोजन्मी कोरले .....

आयुष्याच्या पुस्तकात आठवणींची पानं

प्रत्येकाची वेगवेगळी असतात..... 

काही आठवणी.,पुस्तकातील मोरपीस सारख्या असतात. 

हळुवार स्पर्श करणार्‍या असतात 

काही आठवणी रात्रीच्या गुलाबी थंडीत असतात 

प्रेमाची ऊब देणार्‍या असतात.

 तू त्या रात्री दिलेला तो त्रास मी विसरू कशी....

अजूनही तडफडते आहे....मी सांगू कशी 

त्या गोड आठवणी मनातच आहेत...कुणापुढे मी बोलू तरी कशी...

तू दिसला नाहीस तर मी बेचैन होते...तूच सांग मी राहू कशी ...

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...