Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Wednesday, November 17, 2021

तुझ्या आठवणीत

 असा कुठला क्षण नाही,

तुझी आठवण येत नाही,

अशी कुठली आठवण नाही,

ज्यात तु येत नाही

तू दिलेल्या गोड गुलाबी आठवणी 

देखील हव्याहव्याश्या वाटतात

कदाचित त्या आठवणीं मुळेच

तुझ्या आठवणी ताज्या राहतात 

हातात पेन-वही घेतली की,

काहीतरी लिहावसं वाटतं.

एकदा लिहायला सुरूवात केली की,

सारं काही आठवत जातं.

अनं आठवणींना दुजाेरा मिळाला की,

सारं काही पुन्हा आपलसं करावं वाटतं.....

आठवतं का ग तुला मला भेटण्याची ती उत्सुकता तुझ्या चेहऱ्यावर दिसत होती

भेटण्याचे सुखद क्षण जे कधी न विसरण्यासारखे आहेत,

आठवतं का ग तुला तो दुःखाचा दिवस जेव्हा आपण शेवटचं भेटलो होतो कधीच न भेटण्यासाठी

पण आता आयुष्यात फक्त आठवणीच राहिल्यात,

आणि त्याच आठवणींना घेऊन जगायचं आहे

तुझ्यावर जेवढे प्रेम केले तेवढे

कोणावरच केले नाही…

पुन्हा कोणावर एवढे प्रेम करेन अस

वाटत नाही…

माझ्या आयुष्यात तुला जे स्थान दिले

ते स्थान कोणी कधी मिळवलच असे नाही….

पुन्हा ते स्थान कधी कोणी मिळवल असे वाटतच नाही….

तुझ्याशी जे नात जोडलं ते नाते कधी कोणाशीच जोडले नाही….

पुन्हा कधी ते जोडेन कोणाशी अस वाटत नाही….

तुला जेवढे समावून घेतले मी डोळ्यात….

तेवढे मी कधी कोणाला पहिले पण नाही…

पुन्हा कोण या डोळ्यात दिसेल अस वाटत हि नाही…

किती या वेदना मनाला

7 comments:

  1. खूपचं छान.अप्रतिम👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. अप्रतिम
    खूपचं भावनिक रचना

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर रचना 👌👌👌✍️✍️

    ReplyDelete
  4. अप्रतिमच काव्य रचना ✍✍👌👌
    खुप सुंदर आठवणी कवितेतून व्यक्त केल्या 👍👍👏👏🍫🍫❤

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...