ती वेळ खुपच छान होती
कसा मी तिच्या प्रेमात पडलो
पहिल्या भेटीत गुंतत गेलो
मोहक अशी ती सांज वेळ होती
आकाशाचे प्रतिबिंब त्या जलाशयात तरंगत होते
सुखद क्षणांच्या भेटीसंगे
मनाची अस्वस्था वाढत होती
शब्दांपेक्षा ही नजरेची भाषा बोलतं होतो.
क्षणांत भेट झालेल्या , मनाने मने जुळली ,
तिच्या मनात माझ्या बद्दलची प्रेमभावना जागी झाली ...
चाफ्याच्या सुंगधाप्रमाणे दरवळी.
माझ्यासाठी जणु रातराणीच फुलली ..
प्रेम हे जगावेगळेच जन्मले ,
माझ्या हृदयात तिचे नाव ,
जन्मोजन्मी कोरले .....
खूपच छान प्रेमभाव ...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete