Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Sunday, December 5, 2021

कविता संग्रह

 मला अजूनही आठवतेय ती आपली रात्र.... 

प्रोर्णिमेच्या प्रकाशात हात धरून दूरवर चांदण्यात निथळलेलं आकाशात मी उभी होते, 

अजिंठातल्या शिल्पासारखी, निश्चल जशी वर्याला लाजुन, पानाआड लपनारी लाजाळू काळीच.... 

आपल्या प्रणयाची  चाहूल बहुतेक कल्पवृक्षाला सुद्धा लागली असावी 

ती प्रणयाची रात्र धुंद गंधाने भरलेल्या मोगर्‍याच्या सुंगधासारखी होती.... 

त्या आठवणी दरवळत आहेत 

मनात माझ्या

तू शिल्पकार, तर मी शिल्पकृती आहे. 

तू अथांग सागर, तर तुझ्यात सामावनारी मी सरीता 

तू चांदणे पांघरलेले आकाश तर मी रातराणीचं फुल 

तू कोसळणारा पाऊस तर मी ओल्या मातीचा सुगंध आहे

कसा मी पडलो प्रेमात ,

कधी कळलं नाही....


क्षणांत भेट झाली ,

मनाने मने जुळली ,

तिच्या मनात माझ्या बद्दल ची प्रेमभावना जागी झाली ...


सांजवेळी त्याच्यासाठी मी सजली ,

चाफ्याच्या  सुंगधाप्रमाणे दरवळी..

माझ्यासाठी जणु रातराणीच फुलली ..



प्रेम हे जगावेगळेच जन्मले ,

माझ्या हृदयात तिचे नाव ,

तिच्या हृदयात माझे नाव ..

जन्मोजन्मी कोरले .....

आयुष्याच्या पुस्तकात आठवणींची पानं

प्रत्येकाची वेगवेगळी असतात..... 

काही आठवणी.,पुस्तकातील मोरपीस सारख्या असतात. 

हळुवार स्पर्श करणार्‍या असतात 

काही आठवणी रात्रीच्या गुलाबी थंडीत असतात 

प्रेमाची ऊब देणार्‍या असतात.

 तू त्या रात्री दिलेला तो त्रास मी विसरू कशी....

अजूनही तडफडते आहे....मी सांगू कशी 

त्या गोड आठवणी मनातच आहेत...कुणापुढे मी बोलू तरी कशी...

तू दिसला नाहीस तर मी बेचैन होते...तूच सांग मी राहू कशी ...

7 comments:

  1. वाह सतीश खूप छान कविता आहेत.लई भारी
    फारच सुंदर भाव प्रगट केले आहेस 👌🏼👌🏼👌🏼👏👏👏

    ReplyDelete
  2. सतिश अप्रतिम सुंदर लिहिलय

    ReplyDelete








  3. अतिशय सुंदर रचना
    आयुष्याच्या पुस्तकात आठवणींची पानं प्रत्येकाची वेगवेगळी असतात
    अतिशय सुंदर ओळी

    ReplyDelete
  4. व्वा क्या बात है सुपर्ब रचना ...
    खूप छान लिहिलंय 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूपच छान 👌
    अप्रतिम भाष्य मनमोहकच..!
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💗🌹
    आबा
    🙏

    ReplyDelete
  6. खुपच सुंदर रचना 👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...