घेता स्वामी नाम
धन्य जीवन झाले
ब्रह्मांडनायकाच्या दर्शनाने
सुख हे दारी आले.
मानसी
बेभानक्षणी भान विसरून
पाय कधीतरी घसरतो
भानावर येता क्षणी माणुस
लगेच स्वत:ला सावरतो.
काव्यसखी रंजू
Congratulations. !!
जेष्ठ कवयित्री मानसी जी आणी रंजू जी
हे दोन नावे सर्वांना परिचित आहेतच.
आज त्या दोघी प्रथम क्रमांकावर विराजमान झाल्या आहे. आध्यात्मिक मानसी जी आणि स्त्रीविशेष रंजू जी एक भक्तीकाव्य पुर्ती तर दूसरी चारोळीची राणी
अश्या दोन कवयित्री यांचा मला सहवास लाभला मी माझे भाग्य समजतो.
कारण एकीने मला रस्ता दिला तर दूसरीने रस्त्यावर चालायला शिकवले. माझ्या कविता साहित्य प्रवासात त्याचा खुप मोलाचा वाटा आहे. आज माझ जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादाने शुभेच्छानीं आहे.
तसेच काव्यपुष्प समूहाचे आधारस्तंभ आहेत. काव्यपुष्प समूहात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांचे वेळोवेळी नवोदितांना संधी अणि मार्गदर्शन लाभते. मी त्याच्या साठी एक छान कविता अशोक पत्की यांनी संगीत दिलेली कविता समर्पित करतो त्यांनी ती यूट्यूब ला जाऊन ऐकावी. 🙏
जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गुढ माया
आभाळमाया … आभाळमाया (संग्रहित)
तुमच्या साहित्य लेखणीला मानाचा मुजरा ...!
त्यात वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या काव्यची
शब्द संपदा अनोखी शैली लेखन कौशल्य आम्हांस पहावयास मिळवे.आपण तर नेहमीच उत्साहाचे स्फुंर्तिस्थान आहातच.म्हणूनच आम्ही आपणांस
खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा अभिनंदन.!!!
आणि पुढील वाटचालीसाठी पुर्णतेसाठी मनोकामना.
खूपच सुंदर... एवढी मोठी नाही रे मी ...मनापासून आभार..दुसर काही सुचत नाही ...तुझ्या मनात आमची जागा कायम अशीच राहो हीच स्वामीन चरणी प्रार्थना... एक चांगला शिल्पकार तू आहेसच तितकाच चांगला माणूस आहेस.. प्रत्येक क्षेत्रात अशीच प्रगती करत रहा..👍💞👌✍️✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫👍
ReplyDeleteWaa waa atishay sunder bhavna व्यक्त केल्यात खूप सुंदर लिहलय 👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर व्यक्त झालात आपण...दोघीही उत्तम कवयीत्री...👌👍💐🍫
ReplyDelete