अभिमान या भारतमातेचा
तू प्रतिक समतेचा
तू निर्माण करी प्रेमभावना
सर्वधर्म समभावना
उणीव त्यांनी दिलेल्या सत्याची
भारतीय असल्याची ओळख
तू अंगात निर्माण झालेली धग
तू एक भारतीयाची आठवण
चला करू त्याला वंदन
तू एक सळसळत रक्त
निर्माण झाले कित्येक देशभक्त
तू आमचा तिरंगा
देशप्रेम भिनले अंतरंगा
तू अशी भावना आहेस जी कधीच मिटणार नाही
म्हणुनच मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो काय लिहू मी भारत देशावर भ्रष्ट नेते पाय देत आहेत गरीबांच्या कष्टावर ,
जगाला दाखवण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती तर एकदम उत्तम आहे पण गरीबांचे नाव नसते एका अन्नाच्या दाण्यावर ,
भ्रष्टाचारी मुळे देश मागे जात आहे तरी एक बाब पडत नाही नेतांच्या कानावर ,
झुरले अन्ना हजारे या वयात ही गरीबांच्या हक्कासाठी तरी सहयोग मिळाला त्यांना त्यांच्या लढ्यावर ,
म्हणतात भारताची प्रगती होईल पण हे उमटून राहते फक्त कागदाच्या पानावर ,
ईथे न्याय मिळत नाही चिमुकल्या जीवाला बळी ठरतात पापी बलात्कार्यांना का नाही घालत त्यांना गोळ्या भर रस्त्यावर ? ,
होते महापूरुष गांधी , नेहरू , बोस जे फक्त देशाच्या हितासाठी लढायचे आणि आजचे नेते आहेत त्यांच्या पक्षाच्या हितासाठी लढण्यावर,
तूम्हीच सांगा मी काय लिहू भारत देशावर येते माझ्या डोळ्यात पण पाणी हि अवस्था पाहिल्यावर
खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी , अप्रतीम , वास्तवदर्शी रचना...👏👏👏💐💐💐
ReplyDeleteप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳
अप्रतिम.. वास्तविक लिखाण 👌👌🙏🏼🙏🏼✍️✍️✍️
ReplyDeleteवंदे मातरम् 🙏🙏
ReplyDeleteWaa atishay sunder देशभक्तीपर लिखाण👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिखाण ✍️✍️👌👌👌
ReplyDeleteखूपच छान लेख आहे 👌
ReplyDelete🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा
🙏