Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Wednesday, October 20, 2021

शब्दांच्या सरी

 नभ दाटून आले माझ्या अंगणात 

भिजून चिंब झाली एक ओसरी 

त्यात सांभाळलेल्या शब्दांच्या सरी

खेळ सुरू होता बाहेर पाण्याचा

साचले डबके काही क्षणांचे

रिमझिम बरसणार्‍या पावसात

येणारी त्याची हळवी आठवण,

स्पर्शून जातो अलगद वारा

अशीही एक रात्र यावी

सोबत तुझ्या जी विरून जावी

चांदण्यांच्या विश्वात  रमताना

साथ तुझी मला निरंतर मिळावी........

तू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी

पाउल खुणा मागे सारून

रात्र हि ती विरून जावी.......

चिंब भिजत ओलं होत मन....... 

कळता कळेना तुझ्या नजरेचा लपंडाव,

न कधी सांगितलेस तू तुझे गाव अन् नाव....

छेडूनी नजरेच्या त्या चोरट्या कटाक्षानी,

का आणतेस तू असा भोळेपणाचा आव.....

कुठे गेले ते दिवस ..

जेव्हा मी तुला भेटत होतो ..

तु जरी उशिराने आलीस ..

तरी तुला मात्र समजूण घेत होतो ..

एकदा मला भेटलीस की ..

बोलण तुझ संपत नव्हत ..

रडतानाही हसण तुझ्या ..

गालावर विरघळत होत ..

लाजण तुझ कमी नव्हत ..

पण गालावरच्या खळीमागे ..

ते ही हळूच दडून बसत होत ..

राग तर तुझ्या ..

नाकावरच्या शेङयावर होता ..

कितीही उपाय केले तरीही

तो काही कमी होत नव्हता ..

रागात तर तु फार ..

सुंदर दिसत होतीस ..

म्हणुन तर मला तु ..

तुझ्या रागासकट हवी होतीस..


12 comments:

  1. खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌

    ReplyDelete
  2. प्रेम भावनेत स्वप्न पहीले
    स्वप्नत प्रेमात मी रमलो
    अधीर माझेले मन नव्याने
    जीवनाला प्रेमात नेले
    पहाट होताच स्वप्नातले प्रेम
    स्वप्नातच राहिले.

    अतिशय सुंदर प्रेम मय रचना केलीत.

    ReplyDelete
  3. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना, खूप सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खुप छान रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर रचना👌👌👌

    ReplyDelete
  7. सतू...खूप छान लिहिलंस अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  8. क्या बात है सतीश जीऽ👌
    अप्रतिम खूपच छान शब्दात..!
    सुरेख वर्णन केले आहे..!!
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  9. वाहहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर रचना, अप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...