नभ दाटून आले माझ्या अंगणात
भिजून चिंब झाली एक ओसरी
त्यात सांभाळलेल्या शब्दांच्या सरी
खेळ सुरू होता बाहेर पाण्याचा
साचले डबके काही क्षणांचे
रिमझिम बरसणार्या पावसात
येणारी त्याची हळवी आठवण,
स्पर्शून जातो अलगद वारा
अशीही एक रात्र यावी
सोबत तुझ्या जी विरून जावी
चांदण्यांच्या विश्वात रमताना
साथ तुझी मला निरंतर मिळावी........
तू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी
पाउल खुणा मागे सारून
रात्र हि ती विरून जावी.......
चिंब भिजत ओलं होत मन.......
कळता कळेना तुझ्या नजरेचा लपंडाव,
न कधी सांगितलेस तू तुझे गाव अन् नाव....
छेडूनी नजरेच्या त्या चोरट्या कटाक्षानी,
का आणतेस तू असा भोळेपणाचा आव.....
कुठे गेले ते दिवस ..
जेव्हा मी तुला भेटत होतो ..
तु जरी उशिराने आलीस ..
तरी तुला मात्र समजूण घेत होतो ..
एकदा मला भेटलीस की ..
बोलण तुझ संपत नव्हत ..
रडतानाही हसण तुझ्या ..
गालावर विरघळत होत ..
लाजण तुझ कमी नव्हत ..
पण गालावरच्या खळीमागे ..
ते ही हळूच दडून बसत होत ..
राग तर तुझ्या ..
नाकावरच्या शेङयावर होता ..
कितीही उपाय केले तरीही
तो काही कमी होत नव्हता ..
रागात तर तु फार ..
सुंदर दिसत होतीस ..
म्हणुन तर मला तु ..
तुझ्या रागासकट हवी होतीस..
खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteप्रेम भावनेत स्वप्न पहीले
ReplyDeleteस्वप्नत प्रेमात मी रमलो
अधीर माझेले मन नव्याने
जीवनाला प्रेमात नेले
पहाट होताच स्वप्नातले प्रेम
स्वप्नातच राहिले.
अतिशय सुंदर प्रेम मय रचना केलीत.
खूपच सुंदर कमेंट केली
Deleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
ReplyDeleteअप्रतिम रचना, खूप सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर रचना👌👌👌
ReplyDeleteKhup chaan rachna...👌👍✍️🍫
ReplyDeleteसतू...खूप छान लिहिलंस अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteक्या बात है सतीश जीऽ👌
ReplyDeleteअप्रतिम खूपच छान शब्दात..!
सुरेख वर्णन केले आहे..!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
वाहहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना, अप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete