ही आस नाही केली, श्रीमंतीच्या धनाची
फुलविली बाग ऐसी, येथे परिश्रमाची,
दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा
गुणवंत पाहिला मी, अन्यायी झुंजणारा
विसरून गेला शेवटी, जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला, माणूस करून गेला
काळाच्या डोळ्यावरती, बसलेली होती कात
तू दाविली पहाट, उज्ज्वल प्रखर ती ज्योत
विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम!
आज भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे त्या भारतीयांना त्यांच्या निधनानंतर ५०-५५ वर्षांनी त्यांचे आपल्या देशाच्या राजकीय घटनेमध्ये किती मौल्यवान योगदान आहे याचा साक्षात्कार व्हायला लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत आणि घटना तयार होताना तिच्या जडणघडणीत तसेच तिचा मसुदा तयार करण्यात त्यांनी सर्वाधिक कष्ट घेतलेले आहेत. शेवटी कोणताही समाज कसा चालावा हे कायद्यावरून ठरत असते आणि भारतीय घटनेने आधुनिक कायदे दिलेले आहेत. आता आपल्या देशाचे जे विकासगामी चित्र निर्माण झालेले आहे ते करण्याची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेत केली आहे. त्यामुळे हे शक्य झालेले आहे.
भारतात अनेक लहान-मोठ्या लढाया आणि सततचा रक्तपात यामुळे सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अस्थिरता माजलेल्या या देशाचे आताचे जे चित्र आहे ते त्या हजार वर्षांच्या इतिहासाच्या तुलनेत तपासून पाहिले तर असे लक्षात येते की, भारताची आता होत असलेली जडणघडण ही सावकाशीने झालेली पण एक क्रांती आहे. हजार वर्षाची अस्थिरता, राजेशाही, त्यानंतरची इंग्रजांची गुलामगिरी यानंतर स्वतंत्र झालेला हा देश नेमका कोणत्या राज्यपद्धतीने चालावा याचा निर्णय करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.
या देशातल्या राजकीय परंपरा, लोकांची मनःस्थिती, सामाजिक स्थिती, इतिहास या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून या देशाला कोणत्या प्रकारची राज्यपद्धती योग्य ठरेल याचा निर्णय या नेत्यांनी केला आणि त्याचे सारे कायदेशीर तपशील डॉ. आंबेडकरांनी आपली विद्वत्ता पणाला लावून घटनेमध्ये शब्दबद्ध केले. भारताच्या राजकीय घटनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दोन देणग्या प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या आहेत. त्यातली पहिली देणगी आहे लोकशाहीतील विविध यंत्रणांचे अधिकार आणि त्यांचे परस्परांवरील नियंत्रण.
देशाचा कारभार तीन स्तंभांवर आधारलेला आहे. संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका. यातली संसद सर्वात श्रेष्ठ आहेच कारण ती जनतेने निवडून दिलेली आहे. मात्र न्यायपालिका आणि कार्यपालिका यांनासुध्दा भारतीय घटनने तेवढेच महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. या तिघांच्या अधिकाराचा कोठेही टकराव होऊ नये यासाठी या तीन यंत्रणांचे संबंध कसे असावेत याबाबत आपल्या घटनेत जे नियम केलेले आहेत. ते नियम फार विचारपूर्वक केलेले असल्यामुळेच आपली लोकशाही टिकलेली आहे. त्यातल्या प्रत्येकाला आपले स्वायत्त अधिकार राबविण्याची मुभा दिली. परंतु त्यातला कोणताही घटक आपल्या स्वायत्त अधिकारामध्ये एकाधिकार गाजवू शकणार नाही, अशीही नियंत्रणे त्याच्यावर ठेवली. त्यामुळे ही लोकशाही स्थिर झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबरला झाले असल्यामुळे आज त्यांचा महापरीनिर्वाण दिन देशभर पाळला जात आहे. भारतीयांना अजोड अशी घटना दिल्याबद्दल आपण सर्वांनीच आज त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. या महामानवास लक्ष लक्ष प्रणाम.
ReplyDeleteखुप सुंदर लेख लिहिला आहे.... 👌✍️✍️✍️
सतिश खुप छान कविता,बाबासाहेब आंबेडकर साहेबांबद्दल आणि लेख पण सुंदर लिहलाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷👍👍👍👍👍👍👍👍👍
ReplyDeleteअतिशय सुदंर लेख आणि रचना 👌👌👌
ReplyDeleteमाणसाला माणूस करून गेला अप्रतिम लेख लिहिला सतीश खूप छान लिहिलंय 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर कविता ...आणि तितकाच सुंदर लेख.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.🌹.💐🙏🙏🙏💐🌹👍👌✍️🍫🍫🍫🍫
ReplyDelete