Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Thursday, October 7, 2021

वलय

 हलकासा पाऊस किंचित बोचरी थंडी

हातात वाफाळती कॉफी आणि त्याची उबदार मिठी

सुख ते हेच..पण 

तु नसताना तु असण्याचे भास मला झाले,

मन माझे पावसाळी ओलेचिंब झाले,

पाहताच तुला क्षमली माझ्या डोळ्यांची ती भुक.....

अन् माझ्याभोवती तु असण्याचे वलय नष्ट झाले.....

अन् पुन्हा एकदा त्या चांद राञी मनात भावनांचा गुंता झाला ...

अशाच एका मस्त पावसाळी दिवशी आपण खिडकीतून पावसाची मजा बघावी म्हणून सरसावून बसलेलो असतो.सोबत एखादं पुस्तक ,गरम चहा किंवा कॉफी असते, आणि भज्यांची फर्माईश केलेली असते त्यांचा सगळी स्वादकेंद्र उल्हासित करणारा भज्ज गंध सगळीकडे पसरला असतो.हळू हळू वारा वाहू लागतो, पावसाचा सुगंध ही येऊ लागतो.आपण डोळे मिटून हा स्वर्गीय अनुभव हृदयात साठवतो न साठवतो तोच अचानक वाऱ्याचा वेग एकदम वाढतो आणि आपण सावरायच्या आत तो वारा आणि पाठोपाठ दमदार पाऊस धसमुसळेपणाने आत घुसतो आणि आपली सगळी मनोरथे पाण्यात बुडवतो.या पावसाचा आनंद मानून स्वागत करायचं,की सारं आवरायचं की आपण खिडकी उघडी ठेवली या वेंधळेपणावर रागवायचं तेच आपल्याला सुचत नाही.पण यातही एक वेगळा आनंद असतो हेही खरच !!

10 comments:

  1. खूप खूप छान 👌🏻👌🏻शेवटची ओळ मस्त 😊

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खुपच छान लिहीले आहे मनातील भावनांचा गुंता 👌👌👌
    मस्त 👍👍👍👍अप्रतिम ❤❤❤❤❤❤ सुंदर ❣❣❣❣💞💞💞💞💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  5. खुप सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  7. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  8. सुंदर रचना...मस्तच..👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...