हलकासा पाऊस किंचित बोचरी थंडी
हातात वाफाळती कॉफी आणि त्याची उबदार मिठी
सुख ते हेच..पण
तु नसताना तु असण्याचे भास मला झाले,
मन माझे पावसाळी ओलेचिंब झाले,
पाहताच तुला क्षमली माझ्या डोळ्यांची ती भुक.....
अन् माझ्याभोवती तु असण्याचे वलय नष्ट झाले.....
अन् पुन्हा एकदा त्या चांद राञी मनात भावनांचा गुंता झाला ...
अशाच एका मस्त पावसाळी दिवशी आपण खिडकीतून पावसाची मजा बघावी म्हणून सरसावून बसलेलो असतो.सोबत एखादं पुस्तक ,गरम चहा किंवा कॉफी असते, आणि भज्यांची फर्माईश केलेली असते त्यांचा सगळी स्वादकेंद्र उल्हासित करणारा भज्ज गंध सगळीकडे पसरला असतो.हळू हळू वारा वाहू लागतो, पावसाचा सुगंध ही येऊ लागतो.आपण डोळे मिटून हा स्वर्गीय अनुभव हृदयात साठवतो न साठवतो तोच अचानक वाऱ्याचा वेग एकदम वाढतो आणि आपण सावरायच्या आत तो वारा आणि पाठोपाठ दमदार पाऊस धसमुसळेपणाने आत घुसतो आणि आपली सगळी मनोरथे पाण्यात बुडवतो.या पावसाचा आनंद मानून स्वागत करायचं,की सारं आवरायचं की आपण खिडकी उघडी ठेवली या वेंधळेपणावर रागवायचं तेच आपल्याला सुचत नाही.पण यातही एक वेगळा आनंद असतो हेही खरच !!
खूप खूप छान 👌🏻👌🏻शेवटची ओळ मस्त 😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम 👌👌👌👌
ReplyDeleteखुपच छान लिहीले आहे मनातील भावनांचा गुंता 👌👌👌
ReplyDeleteमस्त 👍👍👍👍अप्रतिम ❤❤❤❤❤❤ सुंदर ❣❣❣❣💞💞💞💞💐💐💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद
Deleteखुप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना!✍️������
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteसुंदर रचना...मस्तच..👌👍✍️🍫🌹
ReplyDelete